top of page

यशस्वी कीर्तनकार बना... यशस्वी प्रवचनकार बना...

कीर्तनविश्व आयोजित

कीर्तन प्रवचन अभ्यासवर्ग - २०२३

KirtanVishwa Logo.png
कीर्तनविश्व
BHISHMA Logo.jpg
भीष्म इंडिक फाउंडेशन 
विश्व मराठी परिषद.jpg
विश्व मराठी परिषद

चार महिन्यांचा ऑनलाईन अभ्यासक्रम

रोज ९० मिनिटे - २२ एप्रिल  ते १८ ऑगस्ट २०२३

सोमवार ते शुक्रवार | सकाळी ०८.०० ते ०९.३० | Zoom द्वारे

 

प्रमुख मार्गदर्शक: आंतरराष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे 

४०० हून अधिक वर्षांची कीर्तन परंपरा, कै. गोविंदस्वामी आफळेबुवा यांचा वारसा समर्थपणे चालवणारे सुपुत्र  

 

एक उत्तम करियर संधी | आंतरराष्ट्रीय ऍक्रिडिएशन प्राप्त अभ्यासक्रम 

महिला-पुरुष सर्वांना प्रवेश | वयोमर्यादा - १५ च्या पुढे

Zoom Live क्लास + ​​उजळणीसाठी सर्व अभ्यासवर्गांचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिले जाणार आहे

Kirtan Pravachan Abhyaskram
  • विविध कीर्तनपरंपरांचा परिचय 

  • भविष्यात डिजिटल माध्यमांमध्ये मोठी संधी ! 

  • करियर विषयक मार्गदर्शन आणि सहाय्य

  • जीवनाच्या... करियरच्या सर्व स्तरांवर उपयुक्त ठरणारा अभ्यासक्रम

  • सध्याच्या करियर सोबत समांतर करियर विकसित करायची संधी

  • आंतरराष्ट्रीय ऍक्रिडिएशन प्राप्त अभ्यासक्रम 

या अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती (Brochure) व्हॉट्सअ‍ॅपवर मागवण्यासाठी 7843083706 या क्रमांकावर Kirtan Abhyaskram असा मेसेज पाठवा.

Ancient Background.jpg

कीर्तन आणि प्रवचन ही एक प्राचीन सांस्कृतिक कला आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा रेडिओ, दूरदर्शन, इंटरनेट नव्हते तेव्हा कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते हेच सामाजिक आणि सांस्कृतिक अभिसरणाची माध्यमे होती. त्यांच्याद्वारेच समाजाचे मानसिक, भावनिक, नैतिक आणि अध्यात्मिक पोषण होत होते. समाजव्यवस्थेचा रहाटगाडगा व्यवस्थित चालवण्यासाठी आणि समाजाचे नैतिक अधिष्ठान टिकवण्यासाठी कीर्तनकारांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. आता पुन्हा एकदा कीर्तनकारांना, प्रवचनकारांना चांगले दिवस येत आहेत. त्याला कारण आहे तंत्रज्ञान ! तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपली संस्कृती आणि परंपरा जगभर पोहोचवण्याची संधी कीर्तनकारांना आणि प्रवचनकारांना उपलब्ध झालेली आहे.

​​विविध कीर्तन परंपरांचा परिचय 

१) नारदीय कीर्तन

२) राष्ट्रीय कीर्तन

३) वारकरी कीर्तन

४) रामदासी कीर्तन

५) दासगणू महाराज कीर्तन 

६) विज्ञान कीर्तन

७) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कीर्तन

८) गाडगेबाबा कीर्तन

९) सामाजिक कीर्तन 

१०) सांस्कृतिक कीर्तन 

अभ्यासक्रम रचना

  • प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन - LIVE ऑनलाईन 

  • (सोम ते शुक्र) रोज एक तास मार्गदर्शन + अर्धा तास प्रश्नोत्तरे

  • मूल्यमापन व परीक्षा : गृहपाठ, तोंडी परीक्षा, लेखी परीक्षा, प्रत्यक्ष सादरीकरण

  • ​दोन दिवसीय प्रत्यक्ष मार्गदर्शनाची दोन सत्रे  - पुणे येथे 

  • उजळणीसाठी सर्व सत्राचे रेकॉर्डिंग मिळणार

  • स्टडी मटेरिअल - हार्ड कॉपी + ईबुक 

  • प्रत्येकाला प्रमाणपत्र | मर्यादित जागा

  • आंतरराष्ट्रीय ऍक्रिडिएशन प्राप्त अभ्यासक्रम 

या अभ्यासक्रमात आपण काय शिकाल ?

  • कीर्तन परंपरेचा इतिहास आणि अखिल भारतातील कीर्तन परंपरांचा परिचय.

  • चार महिन्यात जवळ जवळ २० संतचरित्रांचा परिचय अधिक त्याविषयी प्रवचनाचे तंत्र

  • ​वीस संतांचा वाङमयीन परिचय.

  • प्रमुख पाच कीर्तन पद्धतींचे मांडणी तंत्र.

  • पूर्वरंग - उत्तररंग सहित कीर्तनप्रक्रियेतील सर्व महत्वाचे टप्पे. 

  • कीर्तनाला आवश्यक ती कंठ संगीतात्मक माहिती.

  • टाळ, मृदंग, वीणा, तबला, पेटी या वाद्यांची ओळख.

  • प्रवचनांसाठी अभ्यासग्रंथांचे मार्गदर्शन.

  • वकृत्व कला, संभाषण कला, सादरीकरण व देहबोली, संवाद कौशल्य, कथाकथन कला यांची रहस्ये.

  • कीर्तनाचे अनुशंगाने संस्कृत मराठी श्लोक, सुभाषिते व प्रमाणाधर अशी ओव्या अभंगांची शिदोरी.

main-qimg-0d1aef6033d8afa29c9a5f92ea96a422.jpg

अगोदरच्या बॅच मधील विद्यार्थ्यांचे सादरीकरण

Ancient Background.jpg

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये

  • कीर्तनकलेचा इतिहास, संस्कृती आणि परंपरा यांचा अभ्यास, कीर्तन आख्यानांची तयारी, पूर्वरंग आणि उत्तररंग, अभ्यास आणि सराव, सादरीकरणाची कौशल्ये, विषयांची मांडणी, पूरक हावभाव, देहबोली, श्लोक – सुभाषिते, भाषांतर, कथानके, उदाहरणे, प्रतिपादन कौशल्ये, उपयुक्त स्टडी मटेरीअल (ई-बुक) आणि संदर्भग्रंथांची माहिती

  • पुरुष महिला सर्वांना प्रवेश, किशोरवयीन (१५ वर्षावरील) मुले-मुली आणि युवकांना संधी, कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून एक स्वतंत्र किंवा समांतर करियर विकसित करण्याची संधी

  • प्रत्येकाला सादरीकरणाची संधी

  • भारतीय संस्कृती, परंपरा आणि साहित्य जगापुढे मांडण्याची संधी

  • प्रतिष्ठेबरोबरच अर्थप्राप्तीचे साधन

अभ्यासक्रम - नियम व अटी 

१) या अभ्यासक्रमातील सर्व सत्रे ऑनलाईन झुम मिटिंग द्वारे आयोजित केली जाणार आहेत.

२) पुणे येथे दोन दिवसांची दोन प्रत्यक्ष मार्गदर्शन व सादरीकरणाची सत्रे होणार आहेत (वेळ : रोज सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत) पुणे येथील प्रत्यक्ष सत्रासाठी निवासाची व्यवस्था उपलब्ध नाही. सत्राच्या दिवशी सकाळी नाष्टा व चहा, दुपारचे जेवण व संध्याकाळी चहा या सुविधा उपलब्ध असतील, याची कृपया नोंद घ्यावी. 

३) दिलेल्या वेळापत्रकामध्ये परिस्थितीप्रमाणे बदल करण्याचे अधिकार आयोजक तसेच मार्गदर्शकांकडे आहेत.

४) अभ्यासक्रमाचे सहभागी शुल्क एकत्रच भरायचे आहे.

५) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द करता येणार नाही तसेच भरलेली रक्कम परत करता येणार नाही. वर्ग सुरु होण्याच्या ४ दिवस अगोदर कळवल्यास बदली व्यक्ती देता येईल किंवा भविष्यातील बॅच मध्ये अ‍ॅडजस्ट करता येईल.

६) संपूर्ण माहिती आणि वेळापत्रक इ. वाचून नोंदणी करावी.

७) एकूण अभ्यासक्रमाचे स्टडी मटेरीयल ई-बुक स्वरुपात दिले जाईल.

८) न्यायालयिन प्रक्रियेची सीमा, पुणे शहर न्यायालयिन क्षेत्र हे राहील.

सहभागी शुल्क

(स्टडी मटेरियल आणि रेकॉर्डिंग सह)

शुल्क (भारतातील बांधवांसाठी) : रु. 25,000/-

सहभागी शुल्क एकत्र किंवा दोन भागात भरता येईल.

नोंदणी करताना १५०००/- आणि उर्वरित रक्कम २५ मे २०२३ पर्यंत भरावी लागेल.

शुल्क (भारताबाहेरील बांधवांसाठी) : USD 499/- 

नोंदणी कशी करावी ? 

1️⃣ खालील नोंदणीचे बटण क्लिक करा आणि नोंदणी अर्ज भरा.

2️⃣ अर्ज सबमिट झाल्यावर पेमेंट चे प्रकार दिसतील. ऑनलाईन किंवा बॅंकेत ट्रान्सफर करुन रक्कम जमा करा.

3️⃣ ऑनलाईन केल्यास त्वरित पोच ईमेलवर मिळेल. बॅंकेत जमा केल्यास त्याचे डिटेल्स आमच्या व्हॉट्सअ‍ॅप वर कळवावे.

4️⃣ अभ्यासक्रम सुरु होण्याच्या २४ तास अगोदर ऑनलाईन वर्गाची लिंक आणि इतर माहिती कळवली जाईल.

Payment Options Available: Online - Debit/ Credit Card, Internet Banking, UPI / Wallets OR Bank Transfer

(EMI Available on Selected Debit / Credit Cards [ Facility by Online Payment Gateway] )

चौकशी / माहितीसाठी संपर्क :

मो: 9673998600 / व्हॉट्सअ‍ॅप: 7843083706 / मो: 020-25530371

(सोम ते शनि - सकाळी १०:३० ते सायं. ८ वा.)

ईमेल: sampark@vmparishad.org

कीर्तनविश्व कार्यालय : द्वारा: विश्व मराठी परिषद - ६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, हनुमान चौक, डेक्कन जिमखाना, पुणे - ४११००४

%25E0%25A4%259A%25E0%25A4%25BE%25E0%25A4

मार्गदर्शक 

चारुदत्तबुवा आफळे

​सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार 

श्री. चारुदत्त आफळे यांनी मराठी विषय घेऊन B.A. पदवी प्राप्त केली व संगीत विषय घेऊन M.A. पदवी प्राप्त केली. आणि भक्तीसंगीत व नाट्यसंगीत यावर ते Ph.D. करीत आहेत. आफळे घराण्याला ४०० वर्षाची कीर्तन परंपरा लाभलेली आहे. आफळे घराणे क्षेत्र माहुलीचे. समर्थ रामदासस्वामींच्या समाधीमंदिराकडून आफळे कुटुंबाला कीर्तनसेवेचे व्रत मिळाले. हे व्रत बुवा निष्ठेने चालवीत आहेत. त्यांचे शिक्षण आई वडिलांकडेच झाले. वडील सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे आणि आई सौ. सुधाताई गोविंद आफळे. संबंध महाराष्ट्र आणि देशातही आपल्या कीर्तन परंपरेची पताका फडकवणारे गोविंदस्वामी आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो कीर्तनकार घडले. आई सुधाताई उत्तम कीर्तन प्रवचन करीत. आई वडिलांकडून मिळालेली समृद्ध कीर्तन विद्या जोपासत असताना – श्री. दत्तदासबुवा घाग, श्री. श्रीपादबुवा ढोले, श्री. सुंदरबुवा मराठे अशा नामवंत कीर्तनकारांचे मार्गदर्शन बुवांना लाभले. बुवांनी त्यांच्या आयुष्यातले पहिले कीर्तन वयाच्या पाचव्या वर्षी केले. पण पूर्णतः कीर्तन सेवा १९८८ पासून सुरु झाली.

१९८८ ते २०२१ या तेहतीस वर्षांत देश विदेशातून ५००० चे वर कीर्तने त्यांनी केली आहेत. नाट्यप्रयोग, नाट्यसंगीत कार्यक्रम यांची संख्या वेगळी आहेच. भारत देशात आणि परदेशातही कीर्तनाचा गजर पोहोचविला. कीर्तन करण्याबरोबर अनेक मुलामुलींना ते कीर्तनाचे प्रशिक्षण देतात.

आफळे बुवा संगीत कला अकादमीचे महाराष्ट्रातील तज्ज्ञ प्रतिनिधी तसेच पंढरपूर देवस्थान सल्लागार समितीमध्ये सल्लागार आहेत.

Terms
bottom of page