top of page
hindu sanskar abhyaskram web page design.jpg

जुलै ते डिसेंबर 2025 

मंगळवार ते शुक्रवार | स. 7.45 ते 9.00 

ऑनलाईन वर्ग |​ Zoom द्वारे

लाईव्ह वर्ग | रेकॉर्डिंग मिळेल 

मार्गदर्शक 

Ancient Background.jpg

अभ्यासक्रमाची माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मागवण्यासाठी 9309462627 वर "हिंदू संस्कार प्रशिक्षक अभ्यासक्रम" असा संदेश पाठवा.

सर्टीफाईड सनातन हिंदू संस्कार आणि संस्कृती शिक्षक बना, संस्कार आणि संस्कृती समजून घ्या लाखो लोकांना समजावून सांगा, सुसंस्कारीत समाज घडवण्यासाठी व्यावसायिक पद्धतीने आपले योगदान द्या...

पार्श्वभूमी

संस्कारहीन समाज ही आजची फार मोठी समस्या बनली आहे. मातृदेवो भव... पितृदेवो भव.... आचार्य देवो भव... अशी परंपरा असणाऱ्या या देशांमध्ये मुलांवर, युवकांवर आणि एकंदरीत समाजमनावर संस्कार करणारी कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही. शिक्षण पद्धती अक्षरशः कुचकामी झालेले असून शाळा, महाविद्यालये, त्यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी चार ते पाच टक्के विद्यार्थी सोडले तर इतरांचे पुढे काय होते ते कोणाला कळत नाही आणि कोणालाही त्याची फिकीर नाही. अतिरेकी व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि चंगळवाद यामुळे संपूर्ण समाज विनाशाकडे जात आहे. त्यातच चित्रपट, वेबसिरीज, जाहिराती आणि अन्य माध्यमे समाज भडकावण्याचे आणि समाज नासवण्याचे काम करीत आहेत. यातूनच नैराश्य, हिंसकता, विमनस्कता,  मानसिक आणि बौद्धिक गोंधळ यामुळे एकंदरीत समाजाची परिस्थिती आणि समाज व्यवस्थाच बधीर झाल्याप्रमाणे दिसत आहे. परस्परां विषयी अविश्वास एवढा वाढला आहे की आपला मोबाईलचा पासवर्ड पती पत्नीला किंवा मुलें आई वडिलांना देत नाहीत. आपले ऑनलाईन आणि ऑफलाईन उद्योग कोणालाही कळू नयेत याची प्रत्येकजण सातत्याने काळजी घेत आहे. एका अदृश्य भीतीच्या सावटाखाली सर्वजण जगत आहेत. पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये‌ घराघरांमध्ये आपसूकच संस्कार होत असत. आपल्या मुलांवर संस्कार करणे, त्यांना शिस्त लावणे, त्यांना संस्कृतीची आणि जीवनमूल्यांची ओळख करून देणे, त्यांनी स्वावलंबन आणि चांगल्या सवयी यांचे शिक्षण देणे या गोष्टी घरातच घडत होत्या. कुटुंबातील सदस्य, शेजारी पाजारी, नातेवाईक, मित्र-परिवार सर्वजण संस्कारांची काळजी घेत होते. मात्र आजच्या वेगवान आणि चंगळवादी जीवनशैलीमध्ये ही संस्कार व्यवस्था विस्कळीत झाली आहे. शिक्षण आणि करिअरच्या नादात संस्कार आणि जीवनमूल्ये पायदळी तुडवली जात आहे. त्यातून अनेक सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. नोकरी आणि करियर करणाऱ्या पती-पत्नीच्या मनात कुठेतरी आपली मुले भविष्यात आपल्याला वृद्धाश्रमात टाकतील अशी अदृश्य भीती आहे. अशावेळी संस्कार प्रशिक्षण ही आजच्या काळाची फार मोठी गरज बनली आहे. नोकरी आणि करिअर बरोबर चांगले विचार, चांगले संस्कार, चांगले आदर्श यांची समाजाला मोठी गरज आहे. समाजव्यवस्था टिकून राहण्यासाठी आणि परस्पर संबंध सुदृढ होण्यासाठी हिंदू संस्कार आणि संस्कृती प्रशिक्षक हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

या अभ्यासक्रमाची गरज काय आहे ?

1️⃣ संस्कार शिक्षण देणारी, संस्कार करणारी व्यवस्था आज समाजामध्ये उपलब्ध नाही. संस्कार शिक्षण देणारी आणि संस्कार करणारी व्यवस्था निर्माण करणे आज अत्यावश्यक आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाची फार मोठी गरज आहे.

2️⃣ अतिरेकी‌ व्यक्ती स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यामुळे समाज स्वैराचारी बनण्याचा धोका आहे. तसे आता घडताना आपण पाहत आहोत. त्यातून फार समस्या निर्माण होत आहे. त्यासाठी या अभ्यासक्रमाची गरज आहे

3️⃣ पोलिस, प्रशासन, न्यायालये, सरकार सामाजिक वातावरणावर एका मर्यादा पर्यंत अंकुश ठेवू शकतात. मात्र भीतीतून आणि  दहशतीमधून समाज नियंत्रणात राहू शकत नाही. त्यासाठी संस्कार, नीतीमूल्यांचे आणि जीवनमूल्ये यांचे शिक्षण, प्रचार, प्रसार आवश्यक आहे. त्यासाठी या अभ्यासक्रमाची गरज आहे. 

4️⃣  नैराश्य, हिंसकता, भीती, दहशत, आतंकवाद आत्महत्या, वृद्धाश्रम यांचे प्रमाण प्रचंड वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी या अभ्यासक्रमाची गरज आहे. 

5️⃣ चांगले आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी उच्च शिक्षणाबरोबरच संस्कार, नैतिकता, सात्विक आचरण यांची गरज आहे. समाजव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी आत्मियता, सहकार्य, परस्पर प्रेम, सामंजस्य यांची अतिशय आवश्यकता आहे. केवळ भोगवादी आणि चंगळवादी जीवनपद्धती,  अर्थ आणि काम एवढेच आयुष्याचे ध्येय असणारा समाज लवकरच विनाश पावतो. यासाठी संस्कार आणि संस्कृती शिक्षण आवश्यक आहे. 

6️⃣ संस्कारांबरोबरच जगात कसे वागावे, व्यवसायात, नोकरीमध्ये कसे वागावे, आई-वडिलांचा, ज्येष्ठांचा कसा सन्मान ठेवावा असे वैचारिक, कौटुंबिक, सामाजिक आणि व्यवसायिक संस्कार देखील आवश्यक आहेत. त्यांचं शिक्षण देणे आवश्यक आहे यासाठी या अभ्यासक्रमाची गरज आहे.  

7️⃣ जीवनामध्ये सर्वांगीण प्रगती करण्यासाठी, जीवनात यशस्वी होण्यासाठी, सुखी समाधानी होण्यासाठी संस्कार आवश्यक आहेत. त्यासाठी या अभ्यासक्रमाची गरज आहे

8️⃣ संस्कार प्रशिक्षक ही खूप चांगली करिअर संधी आहे. यामध्ये चांगले काम केल्याचा आनंद तर मिळेलच, त्याचबरोबर त्यातून चांगले आर्थिक उत्पन्नही मिळेल. ज्या व्यक्ती आत्ता या क्षेत्रामध्ये काम सुरू करतील त्यांना भविष्यात फार चांगले करिअर विकसित करता येईल. 

9️⃣ वैयक्तिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये, राज्य, राष्ट्र आणि देशांमध्ये शांतता, सुख, समाधान नांदावे यासाठी हा अभ्यासक्रम अतिशय गरजेचा आहे.

​अभ्यासक्रम रचना 

☑️ प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन - LIVE ऑनलाईन 

☑️ मूल्यमापन व परीक्षा : गृहपाठ, तोंडी परीक्षा, लेखी परीक्षा, प्रत्यक्ष सादरीकरण

☑️ दोन दिवसीय प्रत्यक्ष मार्गदर्शन सत्र  - पुणे येथे 

☑️ उजळणीसाठी सर्व सत्राचे रेकॉर्डिंग मिळणार

☑️ स्टडी मटेरिअल 

☑️ प्रत्येकाला प्रमाणपत्र | मर्यादित जागा

☑️ आंतरराष्ट्रीय ऍक्रिडिएशन प्राप्त अभ्यासक्रम 

या अभ्यासक्रमात आपण काय शिकाल ?

✔️ संस्कार म्हणजे काय ?  त्यांचा इतिहास 
✔️संस्कारांमागचे विज्ञान 
✔️धार्मिक संस्कार, षोडश संस्कार आणि नीती संस्कार 
✔️जगात कसे वागावे ? 
✔️जीवन मूल्यांचा परिचय 
✔️बाल संस्कार, किशोर संस्कार, युवा संस्कार, समाज संस्कार 
✔️संस्कृतीची व्याख्या आणि संस्कृतीची व्याप्ती 
✔️हिंदू संस्कृती, परंपरा आणि सभ्यता 
✔️सण, उत्सव, मेळे आणि कुंभ महाकुंभ 
✔️प्रज्ञा संस्कार, मेधा संस्कार, गर्भ संस्कार
✔️संगीत, नृत्य, वादन, चित्रकला, शिल्प शास्त्र इ. 
✔️देवता, मंदिरे, नवविद्या भक्ती 
✔️परिवार शिक्षा, आचार्य शिक्षा, समाज शिक्षा

हे कोर्सेस कुणासाठी आहेत ? 

1️⃣ 21 वर्षावरील - कोणत्याही व्यक्तीसाठी (महिला / पुरुष) - कमाल वयोमर्यादा नाही.
2️⃣ ज्यांना चांगल्या आणि सुसंस्कृत कामाचा आनंद घ्यायचा आहे आणि त्यातून चांगली अर्थप्राप्ती करून घ्यायची आहे. 
3️⃣ युवक युवती, गृहिणी, निवृत्त, शिक्षक / शिक्षिका, प्रशिक्षक, नोकरदार, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, समाजसेवक, शास्त्रज्ञ, राजकारणी, पुरोहित, मंदिर व्यवस्थापक, सामाजिक आणि शैक्षणिक संस्था चालक, इ.
4️⃣ वर्तमान करिअर बरोबर समांतर करिअर विकसित करणाऱ्यांसाठी 
5️⃣ सेकंड इन्कम - पूरक आर्थिक उत्पन्न हवे आहे त्यांच्यासाठी 
6️⃣ समाज आणि संस्कृतीच्या हितासाठी, पुढील पिढीच्या भविष्यासाठी काम करू इच्छिणाऱ्यांसाठी 
7️⃣ प्रत्येक हिंदू व्यक्तीसाठी, ज्याला यशस्वी जीवन जगायचे आहे त्यांच्यासाठी 
8️⃣ देशामध्ये आणि देशाबाहेर विविध देशांमध्ये ग्लोबल करिअर करावयाचे आहे त्यांच्यासाठी...
9️⃣ ज्यांचे या देशावर आणि संस्कृतीवर प्रेम आहे आणि ज्यांना वैभवशाली विकसित भारत बनवायचा आहे, भारताला विश्वगुरू आणि विश्व विजय बनवायचे आहे त्यांच्यासाठी...

या अभ्यासक्रमामुळे कोणते फायदे होतील ? 

1️⃣ संस्कार प्रशिक्षक म्हणून काम करू शकता. वर्ग चालवू शकता. लहान मुलांसाठी, किशोर वयीन मुलांसाठी, युवकांसाठी संस्कार वर्ग चालवू शकता. ऑनलाईन आणि ऑफलाईन वर्ग घेऊ शकता.

2️⃣ विविध मंदिरे, सामाजिक संस्था, सांस्कृतिक संस्था यामध्ये नोकरी करू शकतात. सेवा देवू शकता.

3️⃣ संस्कार शिबिरांचे आयोजन करू शकता. संस्कार समारंभ इव्हेंट्स साजरे करू शकता. धार्मिक संस्कारांचे आयोजन करू शकता. उदा. षोडश संस्कारांपैकी काही संस्कार, इ.

4️⃣ संस्कार कोच म्हणून व्यावसायिक पद्धतीने कुटुंबासाठी, संस्थासाठी आणि कॉर्पोरेट क्षेत्रांमध्ये काम करू शकता.

5️⃣ शाळा महाविद्यालयांमध्ये संस्कार प्रशिक्षक म्हणून काम करू शकता.

6️⃣ संस्कार आणि संस्कृती यावर व्याख्याने देऊ शकता.

7️⃣ प्रज्ञा संस्कार, गर्भसंस्कार, कथा संस्कार, विद्यासंस्कार जगात कसे वागावे, असे उपक्रम राबवू शकता. संस्कार वर्गांसाठी एका महिन्याला शंभर ते दीडशे रुपये फी घेतली आणि 200 ते 300 व्यक्ती सहभागी झाल्या तरी दरमहा 20 ते 30 हजार रुपये आर्थिक मिळकत होऊ शकते. संस्कार प्रशिक्षक म्हणून दर महिना किमान पंधरा ते वीस हजार इतके मानधन मिळू शकते.

Ancient Background.jpg

🟦 अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये : 

✴️ ऑनलाईन मार्गदर्शन 

✴️ ऑनलाईन परीक्षा 

✴️ उपयुक्त स्टडी मटेरीअल आणि संदर्भग्रंथांची माहिती

✴️ केव्हाही रेकॉर्डिंग पाहण्याची सुविधा 

अभ्यासक्रम - नियम व अटी

1️⃣ या अभ्यासक्रमातील सर्व सत्रे ऑनलाईन झुम मिटिंग द्वारे आयोजित केली जाणार आहेत.

2️⃣ पुणे येथे दोन दिवसीय मार्गदर्शन व सादरीकरण सत्र होणार आहे. पुणे येथील प्रत्यक्ष सत्रासाठी निवासाची व्यवस्था उपलब्ध नाही. सत्राच्या दिवशी सकाळी नाष्टा व चहा, दुपारचे जेवण व संध्याकाळी चहा या सुविधा उपलब्ध असतील, याची कृपया नोंद घ्यावी. 

3️⃣ दिलेल्या वेळापत्रकामध्ये परिस्थितीप्रमाणे बदल करण्याचे अधिकार आयोजक तसेच मार्गदर्शकांकडे आहेत.

4️⃣ अभ्यासक्रमाचे सहभागी शुल्क एकत्रच भरायचे आहे.

5️⃣ एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द करता येणार नाही तसेच भरलेली रक्कम परत करता येणार नाही. वर्ग सुरु होण्याच्या ४ दिवस अगोदर कळवल्यास बदली व्यक्ती देता येईल किंवा भविष्यातील बॅच मध्ये अ‍ॅडजस्ट करता येईल.

6️⃣ संपूर्ण माहिती आणि वेळापत्रक इ. वाचून नोंदणी करावी.

7️⃣ एकूण अभ्यासक्रमाचे स्टडी मटेरीयल ई-बुक स्वरुपात दिले जाईल.

8️⃣ सर्व प्रकारच्या तक्रारींसाठी न्यायालयीन प्रक्रियेची सीमा, पुणे शहर  हे राहील.

अभ्यासक्रम शुल्क व नोंदणी प्रक्रिया

🟫अभ्यासक्रम शुल्क : (स्टडी मटेरियल आणि रेकॉर्डिंग सह)

☑️ शुल्क (भारतातील बांधवांसाठी) : रु. 25,000/-

☑️ शुल्क (भारताबाहेरील बांधवांसाठी) : USD 500/- 

🟩 नोंदणी कशी करावी ? 

1️⃣ खालील नोंदणीचे बटण क्लिक करा आणि नोंदणी अर्ज भरा.

2️⃣ अर्ज सबमिट झाल्यावर पेमेंट चे प्रकार दिसतील. ऑनलाईन किंवा बॅंकेत ट्रान्सफर करुन रक्कम जमा करा.

3️⃣ ऑनलाईन केल्यास त्वरित पोच ईमेलवर मिळेल. बॅंकेत जमा केल्यास त्याचे डिटेल्स आमच्या व्हॉट्सअ‍ॅप वर कळवावे.

4️⃣ अभ्यासक्रम सुरु होण्याच्या २४ तास अगोदर ऑनलाईन वर्गाची लिंक आणि इतर माहिती कळवली जाईल.

Payment Options Available: Online - Debit/ Credit Card, Internet Banking, UPI / Wallets OR Bank Transfer

(EMI Available on Selected Debit / Credit Cards [ Facility by Online Payment Gateway] )

For Students from USA - Fees can be paid through Zelle Code - vmarathiusa@gmail.com

संपर्क

7066251262

9309462627

कार्यालय : द्वारा - विश्व मराठी परिषद - 622, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, हनुमान चौक, डेक्कन जिमखाना, पुणे - 04

7843083706

622, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, हनुमान चौक, डेक्कन जिमखाना, पुणे - 04

कीर्तनविश्व  द्वारा - विश्व मराठी फाउंडेशन

bottom of page