आवाहन
“कीर्तनविश्व ... विश्व रंगवू कीर्तनी” कीर्तनातून सामाजिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय संस्कार घडविणारे YouTube चॅनेल.
कीर्तनविश्व या युटयूब चॅनेलवर एका वर्षामध्ये ५२ आठवड्यामध्ये दर आठवड्याला ३ असे एकूण १५६ कीर्तने प्रदर्शित होतात. गेली ३ वर्षापासून या चॅनेलवर ४५० हून अधिक कीर्तने प्रसिद्ध झाली आहेत. येत्या रामनवमी ला कीर्तनविश्व चे चौथे पर्व सुरु होईल.
ज्याला जेव्हा, जिथे, जे कीर्तन ऐकायचे आहे त्याला ते ऐकता यावे अशी ही संकल्पना आहे. या संकल्पनेला खूप चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत सुमारे १ लाख ४० हजाराहून अधिक subscribers झाले आहेत. सर्व प्रकारच्या म्हणजे नारदीय, राष्ट्रीय, वारकरी, रामदासी, तुकडोजी, गाडगेबाबा, दासगणू, वैज्ञानिक आणि सामाजिक अशा परंपरांना या व्यासपीठावर एकत्रित केले आहे.
प्रती वर्षासाठी रु. ४०-५० लक्ष असा पुढील ९ वर्षांसाठी सुमारे रु. 5-6 कोटी एवढे या प्रकल्पाचे बजेट आहे. एक तप म्हणजे १२ वर्षे... आणि कोणतीही कृती १२ वर्षे म्हणजे एक तप करावी अशी भारतीय संस्कृतीची मान्यता आहे. हे चॅनेल सुरू झाल्यावर सुमारे दोन ते तीन वर्षानी संपूर्ण समाजामध्ये याचे सुपरिणाम दिसून येतील असा विश्वास आहे. देश विदेशातील बंधू भगिनींच्या सहकार्याने हे इंद्रधनुष्य पेलता येईल असाही आम्हाला विश्वास आहे. येत्या तीन वर्षांमध्ये किमान दहा लाख व्यक्ती आणि येत्या दहा वर्षात १ कोटी व्यक्ती चॅनेल सबस्क्राईब करतील अशी योजना आहे.
कीर्तनविश्व प्रकल्पासाठी आर्थिक योगदान द्यावे असे विनम्र आवाहन आम्ही करत आहोत.
अ ) प्रायोजकत्व - कीर्तने प्रायोजित करा ...!
-
एका कीर्तनासाठी - फक्त रु. २१,००० /- (भारतातून) आणि USD 300/- (भारताबाहेरून)
-
एका वर्षासाठी - फक्त रु. ५० लाख /- (भारतातून) आणि USD 70,000/- (भारताबाहेरून)
-
१) वैयक्तिक प्रायोजकत्व : एखाद्या व्यक्तीला किंवा दोन व्यक्तींना एकत्रितरित्या आपल्या आई वडिलांच्या किंवा इतर श्रद्धेय व्यक्तींच्या नावाने एक कीर्तन, काही कीर्तने किंवा संपूर्ण प्रकल्प प्रायोजित करता येईल. कीर्तनाच्या सुरुवातीला नावाची पाटी आणि निवेदनामध्ये नावाचा उल्लेख केला जाईल. तसेच कीर्तन चालू असताना नावाची पट्टी दिसेल.
-
२) संस्था प्रायोजकत्व : एखाद्या ट्रस्टला किंवा संस्थेला एक कीर्तन, वर्षाचा प्रकल्प प्रायोजित करता येईल. कीर्तनाच्या सुरुवातीला, कीर्तनामध्ये आणि कीर्तनाच्या शेवटी एकूण सुमारे ६० सेकंद ट्रस्टची / संस्थेची माहिती दाखवली जाईल.
कीर्तन प्रायोजक योजना : एखाद्या व्यक्तीने आपले आई वडील, सासू सासरे, आजी आजोबा, ज्येष्ठ व्यक्ती यांच्या नावाने किंवा वाढदिवस, नवीन बाळाचे आगमन, साठी किंवा पंचाहत्तरी आणि सहस्त्रचंद्र दर्शन अशा कोणत्याही निमित्ताने, कुलदेवता कुलदेवी स्मरणार्थ, किंवा अन्य निमित्ताने एक कीर्तन प्रायोजित करावे अशी कल्पना आहे. एका कीर्तनासाठी भारतातून रु. २१,०००/- एवढे योगदान अपेक्षित आहे.
एक कीर्तन एक किंवा दोन व्यक्ती किंवा एका कुटुंबातील काही व्यक्ती अशा प्रकारे प्रायोजित करता येतील. २ ते ३ व्यक्ती/मित्र मिळून सुद्धा कीर्तन प्रायोजित करू शकतात. एका व्यक्तीला एका पेक्षा जास्त कीर्तनेही प्रायोजित करता येतील.
कीर्तन प्रायोजित करणाऱ्यांचे नाव, slide आणि फोटो प्रायोजित कीर्तनामध्ये दाखवले जाईल. तसेच त्या कीर्तनाची ओळख करून देताना देणगीदारांची माहिती सांगितली जाईल. कीर्तन विश्व या संकेतस्थळावर आपले नाव आणि आपण प्रायोजित केलेल्या कीर्तनाची लिंक प्रकाशित केली जाईल. याद्वारे आपली माहिती देश विदेशातील लाखों मराठी भाषिकांपर्यंत पोहोचेल. कीर्तनाचा व्हिडिओ युट्युबवर असल्याने निरंतर उपलब्ध असेल.
या क्रांतिकारी प्रकल्पामुळे वैश्विक मराठी भाषिक समाजाच्या सामुहिक, सांस्कृतिक, नैतिक अधिष्ठानामध्ये समृद्धी होईल. त्याचबरोबर प्राचीन कला, संस्कृती आणि इतिहास यांच्याबरोबर नवीन पिढीचे एक अनोखे नाते निर्माण होईल. या क्रांतिकारी उपक्रमामध्ये आपले सहकार्य आणि योगदान खूप महत्त्वपूर्ण असेल असा आम्हाला विश्वास आहे.
कीर्तन निर्मितीमध्ये समाविष्ठ गोष्टी : कीर्तनाचे प्रोफेशनल मल्टी कॅमेरा शुटींग, एडिटींग, कीर्तनकार + वादक मानधन, प्रमोशन, समन्वय इ.
प्रायोजकत्त्वाबद्दल संपूर्ण माहिती व्हॉट्सअॅपवर मागवण्यासाठी 7843083706 या क्रमांकावर Kirtan Prayojak असा मेसेज पाठवा.
चौकशी / माहितीसाठी संपर्क :
मो: / व्हॉट्सअॅप: 7843083706
(सोम ते शनि - सकाळी १०:३० ते सायं. ८ वा.)
ईमेल: sampark@kirtanvishwa.org
कीर्तनविश्व कार्यालय : द्वारा: विश्व मराठी परिषद - ६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, हनुमान चौक,
डेक्कन जिमखाना, पुणे - ४११००४
थेट बँक खात्यात पैसे भरण्यासाठी
बॅंक खात्याची माहिती
खात्याचे नाव : कीर्तन विश्व (Kirtan Vishwa)
बॅंकेचे नाव : बॅंक ऑफ महाराष्ट्र, डेक्कन जिमखाना, पुणे शाखा - 411004
चालू खाते क्र. : 60380656776 | IFSC Code – MAHB0000003
स्विफ्ट कोड : MAHBINBBDGP ( विदेशातून रक्कम जमा करण्यासाठी )
पैसे भरताना Remark मध्ये "डिजिटल कंटेंट निर्मितीसाठी पेमेंट " असा उल्लेख करावा
बॅंक खात्यामध्ये रक्कम जमा केल्यावर Transaction Details ची माहिती, आपले नाव, ईमेल आमच्या 7843083706 या व्हॉट्सअॅपवर पाठवा.
आत्तापर्यंतच्या काही प्रमुख कीर्तनकारांची विविध कीर्तने पाहण्यासाठी खालील लिंक्स क्लिक करा...
नवीन कीर्तनांचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा
ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे
(● श्रीरामजन्म कथा ● हनुमान जन्म कथा ● श्री नृसिंह जन्म कथा ● स्वा. सावरकर चरित्र ● श्री कृष्ण जन्म कथा ● श्री गणेश जन्म कथा)
Watch Charudatta Aphale Kirtans
चैतन्य महाराज देगलूरकर
(● योग्य श्राद्ध कसे असावे ?, ● संत मृत्यूची भीती कशी घालवतात ?, ● कर्मानेच कर्मबंध कसा सुटतो ?)
Watch Chaitanya Maharaj Degalurkar Kirtans
मिलिंदबुवा बडवे
(● नामदेवांची दिवाळी, ● नरसी मेहतांची दिवाळी, ● तुकारामांची दिवाळी)
Watch MilindBuwa Badave Kirtans
मोहनबुवा कुबेर
(रामभक्त : ● केवट चरित्र ● शबरी चरित्र ● भरत परिक्षा)
विवेकबुवा गोखले
(दत्तसंप्रदायी कीर्तने: ● भगवंताकडून काय मागावे? ● सदा संतांपाशी जावे ● मुलांवर चांगले संस्कार आणि श्रीमद आद्यशंकराचार्य जन्म कथा)
Watch Vivekbuwa Gokhale Kirtans
वासुदेवबुवा बुरसे
(● संसाराचे सार काय? ● देव माझा मी देवाचा ● संत अवतार का घेतात?)
Watch Vasudeo Buwa Burase Kirtan
विलासबुवा गरवारे
(● निष्ठा निर्धाराने पाळावी ● आम्ही बिघडलो, तुम्ही बी घडाना ! ● देवाच्या सेवेचे फळ)
स्मिताताई आजेगांवकर
(● संत कान्होपात्रा चरित्र ● बाल मीराबाई चरित्र ● नरसी मेहत्याची लाडी)
Watch Smitatai Ajegaonkar Kirtans
सुहासबुवा वझे
(● बालपणीचे संस्कार राहतात चिरकाल ● हरिनाम हेच खरे धन ● पुण्याचा मार्ग)
Watch Suhas Buwa Vajhe Kirtans
अवंतिकाताई टोळे
(● मन चंगा तो कठौती में गंगा, ● देवाने दिलेल्या भांडवलाचा सदुपयोग, ● साहित्य संपदा ज्ञानेशकन्या गुलाबराव महाराजांची)
Watch Avantika Tai Tole Kirtans
मनोहर बुवा दिक्षित
(● चंद्रकलेची रुपक कथा, ● क्रोध हा खेदकारी नसावा, ● त्यागानेच देव प्राप्ती)
Watch Manohar Buwa Dixit Kirtans
राघवेंद्र बुवा देशपांडे
(● रामदासी- कल्याण भक्ताची परिक्षा ● रंगनाथस्वामी आणि रामदास स्वामी भेट ● चिलाजी पाटील यांवर कृपा)
Watch Raghvendra Buwa Deshpande Kirtan
मानसीताई बडवे
(राणी लक्ष्मीबाई चरित्र - ३ भाग)
जयवंत महाराज बोधले
(● संतभेटीने झालो पोटी शितळ ● धन्य काळ संतभेटी ● संतांचा प्रसाद)
Watch Jayavant Maharaj Bodhale Kirtan
गणेश महाराज भगत
(● अवघाची संसार सुखाचा करीन ● भक्ताची प्रतिज्ञा पूर्ण करण्याची जबाबदारी देवाची ● मला माझीच ओळख करुन देतात ते गुरु)
Watch Ganesh Maharaj Bhagat Kirtan
उमेश महाराज दशरथे
(● धन्य धन्य निवृत्तीदेवा ● शिवाचा अवतार निवृत्ती दातार ● निवृत्तीनाथाचे चरणी शरण)
Watch Umesh Maharaj Dashrathe Kirtan
विश्वासबुवा कुलकर्णी
(● वीर चापेकर बंधू चरित्र, ● वीर मदनलाल धिंग्रा , ● कविराज भूषण चरित्र )
Watch Vishwasbuwa Kulkarni kirtan
महेश बुवा काणे
(● गणेश माहात्म्य भाग १, ● गणेश माहात्म्य भाग २ , ● कथा पालीच्या बल्लाळेश्वराची )
श्रेयसबुवा कुलकर्णी
(● पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर चरित्र , ● विद्या विनयेन शोभते , ● गोपाळकृष्णाची साक्ष )
Watch Shreyas Buwa Kulkarni Kirtan
कौस्तुभबुवा रामदासी
(● या ३ गोष्टी म्हणजे आयुष्याचे सार्थक ● कष्ट करा पण योग्य दिशेने ● भक्तीनवमी म्हणजे काय ? )
Watch KaustubhBuwa Ramdasi Kirtan
संतोष महाराज पायगुडे
(● देवकी-वसुदेवाचा पूर्वजन्म कोणता ? ● कृष्ण यमुनेचा काय करार झाला ? , ● बाळ कृष्णलीला आणि गोपाळकाला )
Watch Santosh Maharaj Paigude Kirtan
संकेतबुवा भोळे
(● लाल बहादूर शास्त्री चरित्र)
Watch Sanket Buwa Bhole Kirtan
क्रांतीगीता ताई महाबळ
(● राजा छत्रसालांची माता ● दुर्गा भाभी बोहरा ● अंतिम विजय, सेनेचा विजय )
गणेश बुवा रामदासी
(● मन रामापायी कसे लावावे ? ● प्रभात म्हणजे सकाळ की उत्कर्ष ? ● प्रगतीचा घातक अहंकार)
Watch Ganesh Buwa ramdasi Kirtan
जगन्नाथ महाराज पाटील
(● कृष्ण चरित्रातील नवल ● सर्वांना भरभरुन देणारा योगिराज ● मन निवते कृष्ण सहवासाने)
Watch Jagannath Maharaj Patil Kirtan
नम्रताताई निमकर
(● देवाची सेवा हीसुद्धा देवभक्तीच ● उत्तम संतती कोणाअला म्हणावे? ● कीर्तने भगवत् प्राप्ती)
Watch Namratatai Nimkar Kirtan
चंद्रकांत महाराज वांजळे
(राम माहात्म्य - ३ भाग)
Watch Chandrakant Maharaj Wanjale Kirtan
वैभवी श्री
(● नामस्मरण कसे करावे? ● प्रेम भक्ती व रुक्ष भक्ती ● जिथे "विश्वास" आहे तिथे "विष वास" नाही)
प्रभंजन भगत
(● साईनाथ अवतरण ● दासगणू-महाराजांवर साई अनुग्रह ● काशीराम शिंपी यांच्यावर साईकृपा)
Watch Prabhanjan Buwa Bhagat Kirtan
याचप्रमाणे कीर्तनविश्व चॅनेलवर प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि रविवारी एक नवीन कीर्तन प्रसिद्ध होत असते... तर नक्की पाहत रहा.
ब ) आर्थिक सहयोग
भारतातील बांधवांसाठी
-
सहयोग करणाऱ्या बांधवांना विशेष ई-प्रमाणपत्र देण्यात येईल.
-
सहयोग डिजिटल कंटेंट निर्मितीसाठी म्हणून स्वीकारण्यात येईल.
-
आयकरात सवलत उपलब्ध नाही.
-
हितचिंतक, आश्रयदाता आणि महाआश्रयदाता बांधवांची नावे कीर्तनविश्वच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जातील.
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन रक्कम जमा करा किंवा बँक खात्यात रक्कम जमा करा व ईमेल व व्हॉटसअपला कळवा.
गुगल पे क्रमांक: 8788243526
UPI ID
8788243526@okbizaxis
चौकशी / माहितीसाठी संपर्क :
मो: / व्हॉट्सअॅप: 7843083706
(सोम ते शनि - सकाळी १०:३० ते सायं. ८ वा.)
ईमेल: sampark@kirtanvishwa.org
कीर्तनविश्व कार्यालय : द्वारा: विश्व मराठी परिषद - ६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, हनुमान चौक,
डेक्कन जिमखाना, पुणे - ४११००४