
जुलै ते डिसेंबर 2025
मंगळवार ते शुक्रवार | स. 7.45 ते 9.00
ऑनलाईन वर्ग | Zoom द्वारे
लाईव्ह वर्ग | रेकॉर्डिंग मिळेल
मार्गदर्शक

अभ्यासक्रमाची माहिती व्हॉट्सअॅपवर मागवण्यासाठी 9309462627 वर "युथ डेव्हलपमेंट प्रशिक्षक अभ्यासक्रम" असा संदेश पाठवा.
सर्टिफाईड युथ डेव्हलपमेंट कोच बना... सर्टिफाईड युवा विद्या प्रशिक्षक बना... जगातील सर्वात जास्त युवा जिथे राहतात त्या भारत देशात युथ कोच म्हणून यशस्वी करिअर करा... तारुण्य म्हणजे काय, तारुण्याचा विकास कसा करायचा, जीवनामध्ये ध्येयाची शिखरे कशी गाठायची, यशस्वी, वैभवशाली आणि समृद्ध जीवन कसे जगायचे त्याचे मंत्र आणि तंत्र शिकून घ्या. आणि लाखो युवकांना ते रहस्य शिकवा....
पार्श्वभूमी
युवकांचा देश… जगातील सर्वात जास्त संख्येने युवक जेथे राहतात तो देश म्हणजे भारत... लोकसंख्येच्या सुमारे 70 % म्हणजे जवळपास 98 ते 100 कोटी लोक हे 15 ते 40 वयोगटातील आहेत. त्यातील तब्बल 42 कोटी 15 ते 29 वयोगटातील आणि 92 कोटी 15 ते 35 वयोगटातील आहेत. ही एक फार मोठी शक्ती आहे. मात्र या युवकांच्या क्षमता विकसित करण्यासाठी सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही. भारतातील सध्याची शिक्षण व्यवस्था ही गुलाम आणि नोकर बनवणारी बनलेली आहे. एकूण विद्यार्थी संख्येच्या ४ ते ५ टक्के विद्यार्थ्यांना सोडले तर इतरांचे पुढे काय होते ते कोणालाही कळत नाही आणि कोणालाही त्याची पर्वा नाही. आजचे समाजकारण, राजकारण, साहित्य, संस्कृती ही सगळी क्षेत्रे युवकांपासून दुरावलेली आहे. युवकांना काय हवे, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांना कसे भविष्य घडवायचे आहे, त्याबाबत मार्गदर्शन करणारी, प्रशिक्षण देणारी, कोणतीही व्यवस्था नाही. सर्व काही राम भरोसे चाललेले आहे. अशावेळी युवा विद्या अर्थात युथ डेव्हलपमेंट प्रशिक्षण हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. करोडो युवकांना प्रशिक्षित करणे, त्यांच्या वैयक्तिक जीवनासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. सोशल मीडिया, इंटरनेट, गळेकापू स्पर्धा, कमी होणाऱ्या नोकऱ्या, बेरोजगारी, ए. आय. चे संकट, हवामानातील बदल, स्वैराचाराला आमंत्रण देणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मादक पदार्थे व अन्य व्यसने, ढासळती कुटुंब व्यवस्था, वाढती लोकसंख्या, इ. अनेक आव्हानांनी युवा पिढी समोर आत्यांतिक संघर्षाची स्थिती निर्माण केली आहे. आपला जन्म का आणि कशासाठी झाला आहे, जीवनाचा अर्थ काय, जीवनाचे ध्येय काय, मैत्री, नातेसंबंध, आर्थिक स्थिरता, आरोग्य, इ. गोष्टींनी तो सैरभैर झालेला आहे. अशावेळी तारुण्य म्हणजे काय ? तारुण्याचा विकास कसा करायचा? तारुण्याचे रहस्य कोणते ? तारुण्यातील विविध ऊर्जा कशा चॅनेलाइज करायच्या, करिअर म्हणजे नक्की काय ? शिक्षण आणि कौशल्ये यांचे समायोजन, आरोग्याची काळजी, लैंगिक ज्ञान म्हणजे तारुण्य भान, जीवनमूल्ये आणि आदर्श, विवाह आणि गृहस्थाश्रम, आर्थिक समृद्धी, इ. अनेक गोष्टींवर त्याला प्रशिक्षित करणे अतिशय आवश्यक आहे. भारतातील सर्व युवक, मुले आणि मुली हे आपल्याचा कुटुंबाचा एक भाग असून त्यांना युवा विद्या शिकवणे, त्यांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक, बौद्धिक, कौशल्याच्या, सांस्कृतिक, भावनिक क्षमता विकसित करणे हे अतिशय आवश्यक आहे.युवकांना सामर्थ्यंशाली बनवणे, त्यांच्यातील विविध क्षमता विकसित करणे आणि त्यांनी वैयक्तिक जीवनात यशस्वी होणे यासाठी युवा विद्या शिकवली पाहिजे. त्यासाठी लाखो युवा विद्या प्रशिक्षक. - युथ डेव्हलपमेंट कोच यांची गरज आहे. त्यासाठीच हा अभ्यासक्रम तयार केला आहे.
या अभ्यासक्रमाची गरज काय आहे?
1️⃣ युवकांना विशेष प्रशिक्षण देण्याची व्यवस्था आता उपलब्ध नाही आहे. त्यांच्या क्षमता आणि कौशल्य यांची विकसित करण्याची कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही. म्हणून या अभ्यासक्रमाची गरज आहे.
2️⃣ सध्याची शिक्षण व्यवस्था युवकांच्या विकासासाठी पुरेशी नाही. नोकर आणि गुलाम बनवणारी, न्यूनगंड वाढवणारी असे आजच्या शिक्षण व्यवस्थेचे स्वरूप झाले आहे. म्हणून या अभ्यासक्रमाची गरज आहे.
3️⃣ जगातील सर्वात जास्त युवक या देशात राहतात. त्यांनी वैयक्तिक जीवनात सर्वांगीण प्रगती करणे आवश्यक आहे. त्यातूनच देशाचा समृद्ध विकास होईल म्हणून या अभ्यासक्रमाची गरज आहे.
4️⃣ आजचा युवक गोंधळलेला आहे. अनेक समस्यांनी तो ग्रस्त आहे. नैराश्याचा सामना करीत आहे. आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. युवकांना मानसिक, भावनिक आणि आर्थिक बळ देण्यासाठी या अभ्यासक्रमाची गरज आहे.
5️⃣ युवा विकास, युवा विद्या, युथ डेव्हलपमेंट क्षेत्रात फार कमी लोक काम करीत आहेत. येथे फार मोठी करिअर संधी आहे. म्हणून या अभ्यासक्रमाची गरज आहे.
6️⃣ सक्षम, संपन्न आणि आर्थिक दृष्ट्या समृद्ध असा सामर्थ्यशाली युवक घडवण्यासाठी या अभ्यासक्रमाची गरज आहे.
7️⃣ संपूर्ण जग एकीकडे वयस्कर म्हणजे म्हातारे होत असताना भारतीय युवकांना संपूर्ण विश्वात खूप मोठ्या संधी उपलब्ध होत आहे. त्यासाठी त्यांना प्रशिक्षित करणे आवश्यक आहे म्हणून या अभ्यासक्रमाची गरज आहे.
8️⃣ योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने आणि स्वतःच्या क्षमतांची जाणीव नसल्याने अनेकदा तरुण वयातील फार मौल्यवान काळ फुकट जातो. साठी नंतर त्याचा पश्चाताप होतो. यासाठी युवकांना अधिकाधिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळावे म्हणून या अभ्यासक्रमाची गरज आहे.
9️⃣ भारतीय युवक विश्वाचा नायक होण्याची गरज आहे. तशी संधी आज उपलब्ध आहे. यासाठी या अभ्यासक्रमाची गरज आहे.
अभ्यासक्रम रचना
☑️ प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन - LIVE ऑनलाईन
☑️ मूल्यमापन व परीक्षा : गृहपाठ, तोंडी परीक्षा, लेखी परीक्षा, प्रत्यक्ष सादरीकरण
☑️ दोन दिवसीय प्रत्यक्ष मार्गदर्शन सत्र - पुणे येथे
☑️ उजळणीसाठी सर्व सत्राचे रेकॉर्डिंग मिळणार
☑️ स्टडी मटेरिअल
☑️ प्रत्येकाला प्रमाणपत्र | मर्यादित जागा
☑️ आंतरराष्ट्रीय ऍक्रिडिएशन प्राप्त अभ्यासक्रम
या अभ्यासक्रमात आपण काय शिकाल ?
✔️ तारुण्य म्हणजे काय?
✔️ तारुण्याचा विकास कसा करायचा?
✔️ युवा विद्या अर्थात तारुण्य विकसित करायचे तंत्र आणि मंत्र
✔️ पंचकोशीय व्यक्तिमत्व विकास
✔️ करिअर म्हणजे नक्की काय ?
✔️ गोल सेटिंग अर्थात जीवनाचे ध्येय कसे ठरवायचे ?
✔️ तारुण्य हृदय आणि तारुण्य स्पंदने
✔️ तारुण्य भान आणि स्त्री-पुरुष नाते
✔️ तारुण्य रहस्य आणि तारुण्य मर्म
✔️ करिअर आणि कौशल्ये
✔️ मित्र, मैत्री, प्रेम आणि सखा संबंध
✔️ युवकांसाठी जीवनमूल्ये
✔️ युवकांनी वागावे कसे?
✔️ यश मिळवण्याची गुरुकिल्ली
✔️ युवकांचे राष्ट्रीय आणि जागतिक सामर्थ्य
✔️ लीड द नेशन... लीड द वर्ल्ड
✔️ तारुण्याचे व्यवस्थापन... त्यातून जीवनाचे व्यवस्थापन
✔️ लिव्ह इन रिलेशन आणि विवाह संस्कार
✔️ आर्थिक स्थिरता आणि समृद्धी मिळवण्याची साधने
हे कोर्सेस कुणासाठी आहेत ?
1️⃣ 21 वर्षावरील - कोणत्याही व्यक्तीसाठी (महिला / पुरुष) - कमाल वयोमर्यादा नाही.
2️⃣ ज्यांना चांगल्या आणि सुसंस्कृत कामाचा आनंद घ्यायचा आहे आणि त्यातून चांगली अर्थप्राप्ती करून घ्यायची आहे.
3️⃣ युवक युवती, गृहिणी, निवृत्त, शिक्षक / शिक्षिका, प्रशिक्षक, नोकरदार, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, समाजसेवक, शास्त्रज्ञ, राजकारणी, पुरोहित, मंदिर व्यवस्थापक, सामाजिक आणि शैक्षणिक संस्था चालक, इ.
4️⃣ वर्तमान करिअर बरोबर समांतर करिअर विकसित करणाऱ्यांसाठी
5️⃣ सेकंड इन्कम - पूरक आर्थिक उत्पन्न हवे आहे त्यांच्यासाठी
6️⃣ समाज आणि संस्कृतीच्या हितासाठी, पुढील पिढीच्या भविष्यासाठी काम करू इच्छिणाऱ्यांसाठी
7️⃣ प्रत्येक हिंदू व्यक्तीसाठी, ज्याला यशस्वी जीवन जगायचे आहे त्यांच्यासाठी
8️⃣ देशामध्ये आणि देशाबाहेर विविध देशांमध्ये ग्लोबल करिअर करावयाचे आहे त्यांच्यासाठी...
9️⃣ ज्यांचे या देशावर आणि संस्कृतीवर प्रेम आहे आणि ज्यांना वैभवशाली विकसित भारत बनवायचा आहे, भारताला विश्वगुरू आणि विश्व विजय बनवायचे आहे त्यांच्यासाठी...
या अभ्यासक्रमामुळे कोणते फायदे होतील ?
1️⃣ सर्टिफाईड युवा विद्या प्रशिक्षक - युथ डेव्हलपमेंट कोच म्हणून डॉक्टर, वकील, इंजिनिअर यांच्या प्रमाणे व्यावसायिक पद्धतीने काम करता येईल.
2️⃣ शाळा, महाविद्यालये या ठिकाणी सर्टिफाईड युवा विद्या प्रशिक्षक - युथ डेव्हलपमेंट कोच म्हणून काम करता येईल.
3️⃣ युथ डेव्हलपमेंट कोच म्हणून वैयक्तिक, कौटुंबिक, संस्थांसाठी, मंदिरासाठी, कॉर्पोरेट कंपन्यांसाठी काम करता येईल.
4️⃣ आपल्या स्थानिक परिसरामध्ये युवा विद्या कोचिंग सेंटर्स - प्रशिक्षण वर्ग सुरू करता येतील.
5️⃣ व्याख्याता म्हणून काम करता येईल.
6️⃣ युवक युवतींसाठी शिबिरे, विविध सांस्कृतिक उपक्रम, इव्हेंटस, सहली, साहसी उपक्रम, इ. आयोजित करता येतील.
7️⃣ युवा विद्या प्रशिक्षक म्हणून ऑनलाईन काम करता येईल.
8️⃣ डिजिटल कंटेंट तयार करता येतील. यूट्यूब चॅनेल सुरू करता येईल.
9️⃣ युवकांसाठी विविध प्रकारची प्रशिक्षण केंद्रे - स्कील डेव्हलपमेंट सेंटर्स सुरू करता येतील.
🔟 स्वतःचे नेतृत्वगुण विकसित करता येतील. हजारो युवकांना घडविता येईल. त्यांचे नेतृत्वगुण विकसित करता येतील. चांगले काम केल्याचा आनंद मिळेल.

🟦 अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये :
✴️ ऑनलाईन मार्गदर्शन
✴️ ऑनलाईन परीक्षा
✴️ उपयुक्त स्टडी मटेरीअल आणि संदर्भग्रंथांची माहिती
✴️ केव्हाही रेकॉर्डिंग पाहण्याची सुविधा
अभ्यासक्रम - नियम व अटी
1️⃣ या अभ्यासक्रमातील सर्व सत्रे ऑनलाईन झुम मिटिंग द्वारे आयोजित केली जाणार आहेत.
2️⃣ पुणे येथे दोन दिवसीय मार्गदर्शन व सादरीकरण सत्र होणार आहे. पुणे येथील प्रत्यक्ष सत्रासाठी निवासाची व्यवस्था उपलब्ध नाही. सत्राच्या दिवशी सकाळी नाष्टा व चहा, दुपारचे जेवण व संध्याकाळी चहा या सुविधा उपलब्ध असतील, याची कृपया नोंद घ्यावी.
3️⃣ दिलेल्या वेळापत्रकामध्ये परिस्थितीप्रमाणे बदल करण्याचे अधिकार आयोजक तसेच मार्गदर्शकांकडे आहेत.
4️⃣ अभ्यासक्रमाचे सहभागी शुल्क एकत्रच भरायचे आहे.
5️⃣ एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द करता येणार नाही तसेच भरलेली रक्कम परत करता येणार नाही. वर्ग सुरु होण्याच्या ४ दिवस अगोदर कळवल्यास बदली व्यक्ती देता येईल किंवा भविष्यातील बॅच मध्ये अॅडजस्ट करता येईल.
6️⃣ संपूर्ण माहिती आणि वेळापत्रक इ. वाचून नोंदणी करावी.
7️⃣ एकूण अभ्यासक्रमाचे स्टडी मटेरीयल ई-बुक स्वरुपात दिले जाईल.
8️⃣ सर्व प्रकारच्या तक्रारींसाठी न्यायालयीन प्रक्रियेची सीमा, पुणे शहर हे राहील.
अभ्यासक्रम शुल्क व नोंदणी प्रक्रिया
🟫अभ्यासक्रम शुल्क : (स्टडी मटेरियल आणि रेकॉर्डिंग सह)
☑️ शुल्क (भारतातील बांधवांसाठी) : रु. 25,000/-
☑️ शुल्क (भारताबाहेरील बांधवांसाठी) : USD 500/-
🟩 नोंदणी कशी करावी ?
1️⃣ खालील नोंदणीचे बटण क्लिक करा आणि नोंदणी अर्ज भरा.
2️⃣ अर्ज सबमिट झाल्यावर पेमेंट चे प्रकार दिसतील. ऑनलाईन किंवा बॅंकेत ट्रान्सफर करुन रक्कम जमा करा.
3️⃣ ऑनलाईन केल्यास त्वरित पोच ईमेलवर मिळेल. बॅंकेत जमा केल्यास त्याचे डिटेल्स आमच्या व्हॉट्सअॅप वर कळवावे.
4️⃣ अभ्यासक्रम सुरु होण्याच्या २४ तास अगोदर ऑनलाईन वर्गाची लिंक आणि इतर माहिती कळवली जाईल.
Payment Options Available: Online - Debit/ Credit Card, Internet Banking, UPI / Wallets OR Bank Transfer
(EMI Available on Selected Debit / Credit Cards [ Facility by Online Payment Gateway] )
For Students from USA - Fees can be paid through Zelle Code - vmarathiusa@gmail.com
संपर्क
7066251262
9309462627
कार्यालय : द्वारा - विश्व मराठी परिषद - 622, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, हनुमान चौक, डेक्कन जिमखाना, पुणे - 04