मुख्य समन्वयक :- विद्यावाचस्पती ह. भ. प. डॉ. चारुदत्तबुवा आफळे
अध्यक्ष :- डॉ. कल्याणीताई नामजोशी
सहयोग :- गोमंतक संत मंडळ संचालित कीर्तन विद्यालय फोंडा, गोवा.
कार्यक्रम वेळापत्रक :-
🗓️ ४ जानेवारी २०२५
सकाळी - १०:३० ते १:३० - परिसंवाद
१:३० ते ३:३० - विश्रांती
दुपारी - ३:३० ते ९:०० - किर्तन सादरीकरण
🗓️ ५ जानेवारी २०२५
सकाळी - ९:३० ते १:३० - किर्तन सादरीकरण
१:३० ते २:३० - विश्रांती
दुपारी - २:३० ते ४:०० किर्तन सादरीकरण
दुपारी - ४:०० ते ५:०० - समारोप कार्यक्रम
युवा पिढीने महाविद्यालयीन शिक्षण घेता घेता विविध प्रकारच्या कला आणि कौशल्ये विकसित केली पाहिजेत. यामध्ये विविध प्रकारचे खेळ, वक्तृत्व, गिर्यारोहण, अभिनय, नृत्य, गायन, संगीत, इत्यादी विषयांमध्ये युवा सहभागी होतात. त्याचबरोबर कीर्तन, कथा, स्टोरी टेलिंग ही सुद्धा पारंपारिक कला कौशल्ये आहेत. त्यातही उत्तम करिअर विकसित करता येते. याच बरोबर वैयक्तिक जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी या पारंपारिक ज्ञानाचा चांगला उपयोग होतो. क्रीडा, नाट्य, अभिनय, संगीत इ. साठी विविध प्रकारच्या स्पर्धा, करंडक, महोत्सव इ. व्यासपीठे उपलब्ध आहेत. मात्र कीर्तन, प्रवचन, कथा इ. साठी प्रोत्साहनात्मक उपक्रम कमी प्रमाणात राबविले जातात. गोवा या आपल्या शेजारच्या राज्यामध्ये विविध संस्था कीर्तन विद्यालये चालवितात आणि उत्तम तऱ्हेचे प्रशिक्षण देतात. त्यातून मोठ्या प्रमाणावर युवक- युवती कीर्तन, कथा, प्रवचन या कलांमध्ये प्रशिक्षित होत आहेत. त्यांच्या कीर्तनांचे सादरीकरण युवा कीर्तन महोत्सवामध्ये होणार आहे. गोव्याप्रमाणेच महाराष्ट्रातील विविध भागातूनही युवक युवतीनी कीर्तन क्षेत्रातील पारंपारिक कला कौशल्ये शिकून घ्याव्यीत. त्यातही उत्तम करिअर करता येत हे लक्षात घ्यावे. डिजिटल माध्यमामुळे पारंपारिक कला कौशल्यांनाही आता चांगले दिवस प्राप्त होत आहेत.
सहभागी होणारे गोव्यातील युवा कीर्तनकार :-
ह.भ.प. ब्रम्हय देवानंद सुर्लकर, ह.भ.प. रमा विराज शेणवी, ह.भ.प. प्रियंवदा सिध्दार्थ मिरींगकर, ह. भ. प. शिवानी सुहास वझे, ह.भ प चिन्मई दामोदर कामत, ह. भ. प. समीक्षा संतोष कुर्टीकर, ह. भ. प. भक्ती रामदास वळवईकर, ह. भ. प. आकांक्षा अमोल प्रभू, ह. भ. प. आर्या मंगलदास साळगावकर, ह. भ. प. मनस्वी विनोद नाईक, ह. भ. प. नेहा अभय उपाध्ये, ह.भ.प. विष्णू फटी गवस, ह.भ.प. ईश्वरी सिद्धेश कांदोळकर, ह. भ. प. पवन अभय पै खोत, ह. भ. प. सना सुधाकर साटेलकर, ह. भ. प. श्रृती अमीन घोडके, ह. भ. प. सांवली संदिप गावकर, ह. भ. प. प्रज्ञा अभय उपाध्ये, ह.भ.प. गायत्री बाळकृष्ण कदम, ह.भ.प. संचित संदिप मणेरीकर.
वरील युवा व बाल - कीर्तनकार गोमंतक संत मंडळ संचालित: कीर्तन विद्यालय फोंडा गोवा, देवकीकृष्ण कीर्तन विद्यालय माशेल गोवा, लक्ष्मीनारायण कीर्तन विद्यालय म्हापसा गोवा येथील आहेत.
गोव्यातील कीर्तनपरंपरेचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. कोकणी भाषेच्या जवळकीमुळे भाषेमध्ये आणि आवाजामध्ये एक विलक्षण गोडवा आहे. गायनामध्ये एक नाद माधुर्य आहे. सादरीकरणाची एक आकर्षक शैली आहे. युवकांमध्ये भरपूर उत्साह आहे. या युवा कीर्तन महोत्सवातील कीर्तने ऐकून आपणा सर्वांना आगळावेगळा आनंद आणि अनुभूती मिळत असा विश्वास आहे. महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमधील सांस्कृतिक संबंध विकसित व्हायला या कीर्तन महोत्सवाचा हातभार लागेल.